कंग्राळी बुद्रुक येथे किरण जाधव यांचे श्री महालक्ष्मी देवी दर्शन; लोककल्याणासाठी प्रार्थना

कंग्राळी बुद्रुक येथे किरण जाधव यांचे श्री महालक्ष्मी देवी दर्शन; लोककल्याणासाठी प्रार्थना


बेळगाव : सकल मराठा समाजाचे नेते व भाजप युवा नेते किरण जाधव यांनी कंग्राळी बुद्रुक येथे जाऊन श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीसमोर नारळ व ओटी अर्पण करून आशीर्वाद घेतला.

लोककल्याणासाठी प्रार्थना करताना सर्व समाज सुखी, समाधानी आणि आनंदी राहावा, समाजातील दुष्ट शक्तींचा नाश व्हावा तसेच शेतकऱ्यांचे भले व्हावे, अशी विनंती त्यांनी देवीकडे केली.

या वेळी श्री महालक्ष्मी यात्रा समितीचे अध्यक्ष जयराम पाटील, अर्जुन पावशे, बाळू पाटील, रोहन पाटील, विजय पावशे यांनी किरण जाधव यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.

कार्यक्रमास सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते तसेच किरण जाधव मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + 9 =

error: Content is protected !!