ज्योती स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू निखिल राठोड याचा सत्कार

ज्योती स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू निखिल राठोड याचा सत्कार

बेळगाव : केंद्रीय विद्यालय-२, कॅम्प येथील विद्यार्थी आणि ज्योती स्पोर्ट्स क्लबचा होतकरू खेळाडू कु. निखिल शिवानंद राठोड याने केंद्रीय विद्यालय विभागीय संघटन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची आगामी केंद्रीय विद्यालय संघटनेच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

निखिल हा अष्टपैलू व गुणी खेळाडू असून, त्याच्या या यशाबद्दल ज्योती स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. त्याच्या यशामागे क्रिकेट प्रशिक्षक बालकृष्ण पाटील तसेच शाळेतील शारीरिक शिक्षण शिक्षक अविनाश सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

तसेच शाळेचे मुख्याध्यापक व ज्योती स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष एल. जी. कोलेकर, क्लबचे सदस्य आणि त्याच्या आई-वडिलांचे प्रोत्साहन त्याला सतत मिळत आहे.

निखिलच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 + 6 =

error: Content is protected !!