.बेळगाव : उद्यमबाग पोलिसांनी गांजा विक्रीप्रकरणी कारवाई करत दोन जणांना अटक केली असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.
२ मे २०२६ रोजी पार्वतीनगर बस स्टँड परिसरात गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पीएसआय पी. जी. गंडवगोल यांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला. यावेळी संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
- गुंडू बाळू कोवाडकर (वय २२, रा. सर्वे गल्ली, उचगाव, बेळगाव)
- प्रज्ञेश ज्ञानेश्वर कांबळे (रा. अंबेडकर गल्ली, उचगाव, बेळगाव)
आरोपींकडून सुमारे ५३५ ग्रॅम गांजा (किंमत ₹२६,७५०), एक मोटारसायकल (₹४०,०००), रोख ₹५२० आणि दोन मोबाईल संच (₹६५,०००) असा एकूण ₹१,३२,२७० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा क्रमांक ४०/२०२६ नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईबद्दल संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.
