सासूनेच जावयाच्या घरात चोरी; १६.५७ लाखांचे सोनं लंपास, दोघांना अटक

सासूनेच जावयाच्या घरात चोरी; १६.५७ लाखांचे सोनं लंपास, दोघांना अटक

बेळगाव : पिरनवाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, सासूनेच जावयाच्या घरात घुसून सोन्याचे दागिने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरनवाडी येथील उज्वला हिने आपल्या साथीदार शिवा अप्पाया यांच्या मदतीने जावयाच्या घरात चोरी केली. संबंधित दांपत्य लग्नसमारंभासाठी बाहेर गेले असताना आरोपीने घरात प्रवेश करून कपाटाची झडती घेतली.

यावेळी सुमारे ११० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने—बांगड्या, अंगठी आणि नेकलेस—असा सुमारे १६.५७ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचे समोर आले आहे. हे दागिने तिच्या मुलीचे असल्याची माहितीही समोर आली आहे.

दांपत्य घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला आणि त्यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलीसांनी आरोपी उज्वला हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगितले जाते.

या प्रकरणी पोलीसांनी उज्वला व शिवा अप्पाया या दोघांना अटक केली असून, चोरीस गेलेले सोनं जप्त करण्यात आले आहे.

या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 1 =

error: Content is protected !!