बेळगाव : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल जप्त केला आहे. ही कारवाई १ मे २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.
पोलिस निरीक्षक आनंद एम. यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून आरोपी साहिल रमेश पाटील (वय २३, रा. शास्त्रीनगर, बेळगाव) याला ताब्यात घेतले. आरोपीकडून क्रिकेट बेटिंगसाठी वापरण्यात येणारा एक मोबाईल फोन आणि १२,९०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे. तसेच या बेटिंग रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे.
या कारवाईत सहभागी असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.
