चेन्नई येथे पार पडलेल्या स्केटर्स इंडिया स्केट गेम्स 2026 या राष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील स्केटर्सनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. भारतीय रोलर स्केटिंग महासंघाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत देशभरातील 600 हून अधिक अव्वल स्केटर्स सहभागी झाले होते.
या कठीण स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी दाखवत एकूण 2 कांस्य पदकांची कमाई केली.
फ्री स्टाईल प्रकारातील पदक विजेते:
- हिरेन राज – कांस्य पदक
- मनन अंबिगा – कांस्य पदक
या सर्व खेळाडूंनी के. एल. ई. सोसायटी स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे नियमित सराव केला आहे. त्यांना प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच, डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी आणि प्रसाद तेंडुलकर यांचेही या खेळाडूंना मोलाचे प्रोत्साहन मिळाले आहे.
या यशामुळे बेळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून सर्व स्तरातून विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
