दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात अक्षय तृतीया, शिवजयंती व परशुराम जयंतीनिमित्त विशेष उत्सव.

दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात अक्षय तृतीया, शिवजयंती व परशुराम जयंतीनिमित्त विशेष उत्सव.

बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात अक्षय तृतीया, शिवजयंती व परशुराम जयंतीनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त मंदिरात विशेष रुद्राभिषेक करण्यात आला.

यावेळी मंदिराची आकर्षक अशी हापूस आंब्यांपासून सुंदर आरास करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही आंब्यांची आरास स्थानिक फ्रुट मार्केटमधील प्रसिद्ध आंबा व्यापारी तुषार बर्डे यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली.

या कार्यक्रमास मंदिराचे ट्रस्टी, सेवेकरी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या उत्सवामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + 17 =

error: Content is protected !!