अक्षय तृतीयेच्या निमित्ताने डी.के. हेरेकर ज्वेलर्सकडून आकर्षक ऑफर्स जाहीर

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने डी.के. हेरेकर ज्वेलर्सकडून आकर्षक ऑफर्स जाहीर

बेळगाव : दागिन्यांच्या क्षेत्रात विश्वासार्ह नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डी के हेरेकर ज्वेलर्सतर्फे अक्षय तृतीया निमित्त ग्राहकांसाठी विशेष व मोठ्या सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर या ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत.

सोन्याची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या या दिवशी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ज्वेलर्सने विविध सवलती जाहीर केल्या आहेत. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट्स देण्यात येणार असून, हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. ही विशेष ऑफर 26 एप्रिलपर्यंत बेळगावमधील डी.के. हेरेकर ज्वेलर्सच्या दोन्ही शाखांमध्ये उपलब्ध असणार आहे.

याशिवाय, अक्षय तृतीया तसेच येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग निमित्त शुद्ध सोन्याच्या वेढणीवर शून्य टक्के मजुरीचा विशेष लाभ ग्राहकांना मिळणार आहे.

परंपरा, विश्वास आणि उत्कृष्ट कारागिरी यांचा वारसा जपणारे डी.के. हेरेकर ज्वेलर्स अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. पारंपारिक आणि आधुनिक डिझाईनचा संगम, आकर्षक कलेक्शन आणि दर्जेदार सेवा यामुळे ग्राहकांना समाधानकारक खरेदीचा अनुभव मिळतो.

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर हमखास भेटवस्तू आणि आकर्षक सवलतींसह दर्जेदार दागिन्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन ज्वेलर्सतर्फे करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten − three =

error: Content is protected !!