सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाची दखल; सह्यांच्या मोहिमेला वेग देण्याचे आवाहन

सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाची दखल; सह्यांच्या मोहिमेला वेग देण्याचे आवाहन

बेळगाव : खादरवाडी येथील प्रकाश नेसरकर यांनी महाराष्ट्र–कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाला पत्रव्यवहार केला होता. एका सामान्य व्यक्तीच्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत संबंधित प्रक्रिया सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एका व्यक्तीच्या पत्रामुळे सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्याने, बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सुरू असलेल्या सह्यांच्या मोहिमेमुळे निश्चितच प्रभावी परिणाम होऊ शकतो, असा विश्वास समिती नेत्यांनी व्यक्त केला आहे.

सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या सह्यांच्या मोहिमेत सर्व मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाखो सह्यांचे निवेदन लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − ten =

error: Content is protected !!