शिवजयंतीनिमित्त मोफत रंगभूषा सेवेचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त मोफत रंगभूषा सेवेचे आयोजन

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही 2026 साली सकल मराठा समाज व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वडगाव, शहापूर व बेळगाव येथे होणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत विविध ऐतिहासिक पात्रांचे प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या कलाकारांसाठी मोफत रंगभूषा (मेकअप) सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून शिवजयंती अधिक भव्य व आकर्षक करण्याचा तसेच कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. यासाठी परिसरातील मेकअप आर्टिस्टांनी सेवा भावनेतून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सहभागी होणाऱ्या कलाकारांना मानधन स्वरूपात सेवा शुल्क देखील देण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी इच्छुक मेकअप आर्टिस्ट व सहकार्य करू इच्छिणाऱ्यांनी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

संपर्क:
संजय सातेरी – 9880042636
सागर पाटील – 9964777565
विराज मुरकुंबी – 9945864341
उदय पाटील – 7090189695
मनोहर हलगेकर – 9972468078
दुर्गाप्रसाद जोशी – 9343883772
महादेव पाटील – 9481535528

या उपक्रमास सर्वांनी सहकार्य करून शिवजयंती उत्सव अधिक उत्साहात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 🚩

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × one =

error: Content is protected !!