बेळगाव शहरात वाहतूक कोंडीवर उपाय; दोन प्रमुख रस्त्यांवर वन-वे ट्रॅफिक लागू

बेळगाव शहरात वाहतूक कोंडीवर उपाय; दोन प्रमुख रस्त्यांवर वन-वे ट्रॅफिक लागू

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत दोन प्रमुख रस्त्यांवर “वन-वे ट्रॅफिक” (एकमार्गी वाहतूक) व्यवस्था लागू केली आहे.

शहरातील गर्दीच्या भागात वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यांवरील अडचणी लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांशी चर्चा करून त्यांच्या सूचनांचा विचार करण्यात आला. सुमारे 80 टक्के नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे.

नवीन नियमानुसार

  1. देशपांडे पेट्रोल पंप ते मुजावर खूटकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतूक सुरू राहील.
  2. जिजामाता सर्कल ते देशपांडे पेट्रोल पंपकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतूक सुरू राहील.

ही वन-वे व्यवस्था 13 एप्रिल 2026 पासून लागू करण्यात आली असून, शहरातील इतर गर्दीच्या भागांमध्येही अशाच उपाययोजना करण्याचा विचार सुरू आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 2 =

error: Content is protected !!