कर्नाटक बारावी (II PUC) निकाल आज जाहीर; दुपारी ३ वाजता पाहता येणार

कर्नाटक बारावी (II PUC) निकाल आज जाहीर; दुपारी ३ वाजता पाहता येणार

Karnataka School Examination and Assessment Board यांनी २०२६ च्या II PUC (बारावी) परीक्षा-१ चा निकाल आज, दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जाहीर होणार असल्याची अधिकृत माहिती दिली आहे.

विद्यार्थ्यांना आपला निकाल अधिकृत संकेतस्थळ karresults.nic.in तसेच कर्नाटक वन मोबाईल अ‍ॅपवर पाहता येणार आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर निकालाची माहिती WhatsApp किंवा SMS द्वारेही पाठविण्यात येणार आहे.

यंदा प्रथमच गुणपत्रिका डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना Digilocker द्वारे दुपारी ३ वाजल्यापासून मार्क्स कार्ड डाउनलोड करता येणार आहे.

तसेच निकालपत्रक संबंधित महाविद्यालयांनाही त्याच वेळी उपलब्ध करून दिले जाणार आहे. मंडळाने सर्व विद्यार्थ्यांना वेळेत निकाल तपासण्याचे आवाहन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 − two =

error: Content is protected !!