माळमारुती पोलिसांची कारवाई; अवैध दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल

माळमारुती पोलिसांची कारवाई; अवैध दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल

बेळगाव : माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

७ एप्रिल २०२६ रोजी गंगावाडी परिसरात संशयित हालचालींची माहिती मिळाल्यानंतर माळमारुती पोलीस ठाण्याचे एएसआय एम. यू. हिरेमठ व त्यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी आरोपी डॉन मेहताजी चौगुले हा कोणतीही परवानगी न घेता विविध कंपन्यांची दारू विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

छाप्यात पोलिसांनी विविध कंपन्यांची दारू तसेच मोबाईल असा एकूण ९,७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२/२०२६ अन्वये कलम ३२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 − two =

error: Content is protected !!