लोंढा येथे इस्टर दिवशी मारहाण; ५ जणांवर अजामिनपात्र गुन्हा

लोंढा येथे इस्टर दिवशी मारहाण; ५ जणांवर अजामिनपात्र गुन्हा

खानापूर : लोंढा गावात इस्टरच्या दिवशी झालेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना ताब्यात घेऊन हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये जॉन्सन डिसोझा, विल्सन डिसोझा, नेल्सन डिसोझा, अझहर कंजरी आणि विनोद भंडारी यांचा समावेश आहे. या सर्वांवर BNS कलम 189(2), 191(2), 191(3), 126(2), 115(2), 118(1), 118(2), 351(3) व 352 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (गुन्हा क्र. 113/2026, दि. 05/04/2026)

या घटनेत रॉबिन जॉन्सन आरेकर व पीटर जॉन्सन आरेकर या दोन भावांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये रॉबिन आरेकर गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने प्रथम खानापूर सरकारी रुग्णालयात उपचार करून नंतर अधिक उपचारासाठी बेळगावातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले आहे. तर पीटर आरेकर याला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती आहे.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून पोलिसांनी कठोर कारवाई करून शांतता राखावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सदर घटनेचा अधिक तपास खानापूर पोलीस करत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × two =

error: Content is protected !!