महाशिवरात्रीनिमित्त ‘मातोश्री ट्रॉफी’ ग्रामपंचायत प्रीमियर लीगचे जल्लोषात उद्घाटन

महाशिवरात्रीनिमित्त ‘मातोश्री ट्रॉफी’ ग्रामपंचायत प्रीमियर लीगचे जल्लोषात उद्घाटन

मण्णूर – मातोश्री क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन, मण्णूर यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त मण्णूर, आंबेवाडी व गोजगे या तीन गावांच्या संयुक्त विद्यमाने ‘मातोश्री ट्रॉफी’ ग्रामपंचायत प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन मण्णूर येथील छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडवर उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती पूजनाने झाली. गावातील ज्येष्ठ नागरिक शिवाजी रानबा कालकुंद्री व देवाप्पा रुक्माणा शहापूरकर यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्यात आले. मधुकर भैरू चौगुले यांनी ध्वजपूजन तर महादेव शंकर डोनकरी यांनी मशाल पूजन केले. लक्ष्मण शंकर चौगुले, किरण चौगुले, भैरू पुंडलिक चौगुले व भरमा आनंदाचे यांच्या हस्ते क्रिकेट रॅलीचे उद्घाटन झाले. वाजत-गाजत मशाल व ध्वज कार्यक्रमस्थळी आणण्यात आले.

श्री देवाप्पा म्हात्रू चौगुले यांच्या हस्ते स्टेज पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. द्वीपप्रज्वलन श्री मुकुंद भावकु तरळे, लक्ष्मण कल्लाप्पा कालकुंद्री, भाऊराव सांबरेकर, सुरज मंडोळकर, सागर कटगेन्नावर आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. श्री गणेश व जिजामाता फोटो पूजन ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी यळगूकर, सौ. लक्ष्मी शंकर सांबरेकर व सौ. अन्नपूर्णा भरत चौगुले यांनी केले.

चषक पूजन सोमनाथ कांबळे, विनायक कल्लाप्पा चौगुले, महेंद्र चौगुले व शामसुंदर मालाई यांनी केले. मातोश्री फौंडेशनच्या बॅनरचे अनावरण अध्यक्ष अनिल कृष्णा काकतकर व सर्व टीम मालकांच्या हस्ते झाले. सर्व खेळाडूंना मातोश्री सौहार्द सोसायटीच्या वतीने जर्सी देण्यात आल्या. त्या जर्सीचे अनावरण सोसायटीच्या संचालक व सल्लागारांच्या हस्ते करण्यात आले.

ग्राउंड पूजन युवराज कृष्णा काकतकर यांनी तर यष्टी पूजन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील यांनी केले. क्रिकेट सामन्याचे उद्घाटन विठू माउली कन्स्ट्रक्शनचे मालक शंकर सांबरेकर व मातोश्री सौहार्द सोसायटीचे चेअरमन आर. एम. चौगुले यांच्या हस्ते झाले.

यावेळी एशियन गेम्स 2026 चेन्नई येथे पोहण्याच्या प्रकारात दोन सुवर्णपदके पटकावणाऱ्या मयंक नागेश हालदार व त्यांचे आई-वडील तसेच प्रशिक्षक शामसुंदर मालाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला. खेळाडू व पाहुण्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था व्हॉइस चेअरमन सागर कटगेन्नावर यांनी केली, तर मेडिकल किटची व्यवस्था डॉ. भरत चौगुले यांनी केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. एम. चौगुले तर स्वागताध्यक्ष म्हणून अनिल काकतकर होते. टी. के. मंडोळकर, एन. के. कालकुंद्री, भरमा मा. चौगुले, सतीश बोगाळे, नागेश चौगुले, राहुल मंडोळकर, सुनील काकतकर, गौतम नाईक, विजय मंडोळकर, अभिषेक काकतकर, सुनील सुधाकर चौगुले, धर्मराज काटग्यान्नावर, उमेश शिंदे, मधू कडोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप डोनकरी व डॉ. भरत चौगुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन मातोश्रीचे संचालक शंकर अप्पुगोल यांनी केले. स्पर्धेच्या निमित्ताने तिन्ही गावांमध्ये क्रीडा मैत्रीचे वातावरण निर्माण झाले असून स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − 9 =

error: Content is protected !!