अॅथेन्स (ग्रीस) | जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2025
दि. 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान ग्रीसच्या अॅथेन्स येथे झालेल्या अंडर-17 महिला जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी करत जागतिक विजेतेपद पटकावले. भारताने एकूण 151 गुणांसह प्रथम क्रमांक मिळवून U-17 वर्ल्ड विमेन्स रेसलिंग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपल्या नावावर केली.
या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून बेळगावचे रामचंद्र मारुती पवार यांनी काम पाहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या 10 महिला कुस्तीपटूंनी सर्व वजनगटात सहभाग घेतला. त्यापैकी 6 कुस्तीपटूंनी पदकांची कमाई केली.
पदकविजेते खेळाडू:
- 43 किलो – रचना – सुवर्ण
- 49 किलो – कोमल – कांस्य
- 57 किलो – मोनि – रौप्य
- 61 किलो – याशिता – रौप्य
- 65 किलो – अश्विनी – सुवर्ण
- 73 किलो – काजल – रौप्य
या कामगिरीमुळे भारताने अमेरिका (142 गुण) व जपान (113 गुण) यांना मागे टाकत जागतिक विजेतेपद पटकावले. प्रशिक्षक रामचंद्र पवार यांचे मूळ गाव बेळगाव असून, त्यांनी या ऐतिहासिक विजयात मोलाचे योगदान दिले.
ही कामगिरी भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी अत्यंत गौरवाची असून, पवार यांच्या नेतृत्वाखालील संघाने जागतिक स्तरावर देशाची मान उंचावली आहे.