समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व शिवसैनिक रामा शिंदोळकर यांच्या निधनानिमित्त भावपूर्ण शोकसभा

समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व शिवसैनिक रामा शिंदोळकर यांच्या निधनानिमित्त भावपूर्ण शोकसभा

बेळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने ज्येष्ठ शिवसैनिक आणि मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी आजीवन संघर्ष करणारे ज्येष्ठ नेते रामा शिंदोळकर यांच्या समाधानी कार्याची आठवण ठेवत शिवसेना कार्यालय, बेळगाव येथे भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले.

या शोकसभेला शिवसेना बेळगाव जिल्हाध्यक्ष व उपमहापौर प्रकाश शिरोळकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, शिवसेनेचे महेश टगसाळे, माजी नगरसेवक अनिल पाटील, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, मनोहर हुंदरे, ज्येष्ठ नेते यल्लाप्पा मुचंडीकर, राजू बोकडे, प्राध्यापक निलेश शिंदे, किसन सुंठकर, विनायक बेळगावकर, महंतेश कोळुचे, सुनील बोकडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या भाषणातून रामा शिंदोळकर यांनी मराठी भाषा, हक्क आणि सीमा प्रश्नांसाठी दिलेल्या अविरत लढ्याचे स्मरण केले. त्यांच्या निष्ठा, समर्पण आणि संघर्षमय कार्याचा गौरव करत सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

बेळगावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि शिवसेना कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहून शोकसभेत सहभागी होत त्यांनी या लढवय्या कार्यकर्त्याला श्रद्धांजली अर्पण केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten − three =

error: Content is protected !!