बेळगाव : अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला वर्षानुवर्षे सेवा बजावत असून, निवृत्तीनंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा पेन्शन लाभ मिळत नाही. या अन्यायकारक परिस्थितीविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी एकत्र येत धरणे आंदोलन केले.
महिलांनी आपल्या हक्कासाठी जोरदार घोषणाबाजी करत निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यांनी मागणी केली की, राज्य सरकारने तात्काळ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन योजना लागू करून निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा द्यावी.
आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी सर्वसाधारण भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
#Belgav #BedhadakBelgav
