मराठा समाज सुधारणा मंडळ व हलगा ग्रामस्थांच्या वतीने अजित दादा पवार यांना श्रद्धांजली

मराठा समाज सुधारणा मंडळ व हलगा ग्रामस्थांच्या वतीने अजित दादा पवार यांना श्रद्धांजली

मराठा समाज सुधारणा मंडळ व हलगा ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या निधनामुळे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोकसभा रविवार, दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8 वाजता मरगाई मंदिर परिसरात पार पडली.

शोकसभेच्या अध्यक्षस्थानी मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा सामजी होते. यल्लाप्पा सामजी यांच्या हस्ते अजित दादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित मराठा समाज सुधारणा मंडळाच्या सदस्यांच्या वतीने अजित दादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी मनोहर संताजी, भुजंग बिळगोजी व यल्लाप्पा सामजी यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित दादा पवार यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला.

या शोकसभेस शिवाजी संताजी, पियुष मोरे, संभाजी संताजी, कुमार जाधव, सुशांत बिळगोजी, निलेश संताजी, दयानंद शिंदे, धाकलू बिळगोजी, गोरप्पा मोरे यांच्यासह हलगा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − 10 =

error: Content is protected !!