वडगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 32, रयत गल्ली येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त 14 नोव्हेंबर 2025 रोजी बालदिन तसेच पालक-शिक्षक महासभेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या एस.डी.एम.सी.चे अध्यक्ष आनंदा बिरजे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून गोपाळराव बिरजे, जीवन बिरजे आणि राजू मर्वे हे उपस्थित होते.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक के. टी. चव्हाण यांनी स्वागत व प्रस्ताविक करत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. प्रमुख पाहुण्यांनी पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घर-शाळा समन्वयाची गरज अधोरेखित केली.
आर. एन. जाधव सरांनी महासभेचा उद्देश सांगत बालविवाह प्रतिबंधक माहिती, पोक्सो कायदा, आरटीई कायदा तसेच ओओएससीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या प्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधान मूल्यांची जाण करून देण्यात आली.
या कार्यक्रमाला नागेंद्र पवार, अरविंद अवचारे, किरण जोशी, काजोळकर, होसुरकर, वैशाली हनुमंतराव, लता हलगेकर, सुजाता बिरजे, अनिता रेडेकर यांसह पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एन. जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन के. टी. चव्हाण यांनी केले.
