बेळगाव : बेळगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या चव्हाट गल्लीतील श्री मूर्तीच्या मंडपाचे शुद्धीकरण व पूजन सोहळा रविवारी मंत्रोच्चार व धार्मिक विधींनी मोठ्या भक्तीभावात पार पडला. या वेळी मंडपाचे विधिपूर्वक पूजन, होमअवहन आदी धार्मिक क्रियाकलाप संपन्न झाले.
मंडपाभोवती आकर्षक रांगोळी, फुलांची सजावट, मंगल फळेफुले व पानांनी वातावरण मंगलमय झाले होते. पुरोहित विठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे कार्याध्यक्ष सुनिल जाधव व उपाध्यक्ष सौरभ पवार यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन करून मंडपाचे शुद्धीकरण करण्यात आले.
यंदाच्या सोहळ्यात होमअवहनासोबतच गांभीर्य व भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी परिसरातील नागरिक, महिला व युवकांनी मोठ्या श्रद्धेने पूजा-अर्चेत सहभाग घेतला.
या प्रसंगी प्रताप मोहिते, उत्तम नाकाडी, मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, सुधीर धामनेकर, अभिषेक नाईक, सत्यम नाईक, वृषभ मोहिते, विनायक पवार, भरत काळगे, विशाल मुचडी, अनंत बामणे, सौरभ पवार, हर्षल नाईक, महिंद्र पवार, निखील पाटील, रोहन जाधव, संदीप कामुले, राहुल जाधव, संजय रेडेकर, विशाल मूचंडी, उमेश मेणसें यांसह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.