बेळगाव – बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद आणि हितचिंतक यांची एक महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक रामलिंग खिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेस येथे होणार आहे.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सर्व संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीत सीमाभागातील सद्यस्थिती, आगामी आंदोलनात्मक कार्यक्रमांची आखणी, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मराठी भाषिक हक्कांसाठी कार्यरत असलेल्या समितीच्या या बैठकीला शहरातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, युवा सदस्य आणि मार्गदर्शक मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.