बेळगाव जिल्हा हॉकी संघ रवाना; खेळाडूंना शुभेच्छांचा वर्षाव

बेळगाव जिल्हा हॉकी संघ रवाना; खेळाडूंना शुभेच्छांचा वर्षाव

बेळगाव :
लेले मैदान, टिळकवाडी येथे आज रविवार, १ फेब्रुवारी २०२० रोजी हॉकी बेळगावच्या वतीने बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मुला-मुलींच्या हॉकी संघांना स्पर्धेसाठी रवाना करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तान चे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुलाप्पा होस्मानी, सेक्रेटरी सुधाकर चाळके, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर, जॉईंट सेक्रेटरी सागर पाटील, मनोहर पाटील, नामदेव पाटील, तसेच हॉकी बेळगावचे प्रशिक्षक उत्तम शिंदे उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत बेळगाव जिल्ह्याचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर उज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. खेळात शिस्त, मेहनत व संघभावना महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी मोठ्या संख्येने हॉकीप्रेमी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. उत्साहपूर्ण वातावरणात बेळगाव जिल्हा हॉकी संघ स्पर्धेसाठी रवाना झाला.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − 14 =

error: Content is protected !!