बेळगाव :
मार्केट यार्ड येथील राजर्षी शाहू सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. मागील पाच वर्षांत संचालक मंडळाने संस्थेच्या हितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुढील पाच वर्षांसाठीही सर्व संचालकांना कायम ठेवण्यात आले आहे.
यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमनपदी सौ. बेबी तुकाराम पाटील यांची, तर व्हाइस चेअरमनपदी राजू के. जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
या बैठकीस संचालक सुरेश चौगुले, हेमंत पाटील, राहुल होनगेकर, अशोक बामणे, नरसिंह पाटील, विक्रमसिंह कदम पाटील, गजानन बी. सुतार, यल्लापा कांबळे तसेच संचालिका सौ. शोभा एस. जाधव उपस्थित होत्या. याशिवाय सल्लागार दीपक होनगेकर, टी. एस. पाटील, सुरेश जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाइस चेअरमन यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दोघांनीही संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी व हितासाठी कटिबद्ध राहून कार्य करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमास व्यापारी वर्ग व संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माणिक होनगेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे सेक्रेटरी सुभाष कुराडे यांनी केले.
