दिल्ली │ खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी काल रात्री दिल्ली येथे दाखल होऊन “संघटन सृजन अभियान – उत्तराखंड” चा रिपोर्ट सादर करण्यासाठी महत्वाचा पाऊल उचलले.
आज त्यांनी कॉंग्रेस मुख्यालयात एआयसीसीचे संघटन महामंत्री के. सी. वेणुगोपाल, उत्तराखंड प्रभारी कुमारी शैलजा, तसेच पक्षाच्या वार रूमचे सदस्य सेंथीलजी आणि वामसी रेड्डी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अभियानाचा सविस्तर अहवाल हायकमांडकडे सुपूर्द केला.
दिल्ली दौऱ्यानंतर डॉ. अंजलीताई आज तेलंगणा दिशेने रवाना होतील. या भेटीमुळे काँग्रेस पक्षातील संघटनात्मक कामकाजाला गती मिळण्याची शक्यता आहे आणि माजी आमदारांच्या अनुभवाचा फायदा पुढील योजनांमध्ये होईल असा पक्षात अंदाज व्यक्त केला जात आहे.
