कॅपिटल-वनतर्फे एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला; २२ नोव्हेंबरपासून प्रारंभ

कॅपिटल-वनतर्फे एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला; २२ नोव्हेंबरपासून प्रारंभ

बेळगाव : अनसुरकर गल्ली, बेळगाव येथील कॅपिटल-वन संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे वेळापत्रक संस्थेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

बेळगाव आणि परिसरातील शालेय परीक्षांमध्ये अनुक्रमे पहिले पाच क्रमांक मिळविणारे गुणवंत विद्यार्थी तसेच शैक्षणिकदृष्ट्या मागे असलेल्या पाच विद्यार्थ्यांना या व्याख्यानमालेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणे आणि एसएसएलसी परीक्षेची प्रभावी तयारी करून घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

रविवार दि. २२ नोव्हेंबर २०२६ ते रविवार दि. २७ डिसेंबर २०२६ या कालावधीत दर रविवारी सकाळी ८.१५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहे.

व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ रविवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात संस्थेचे संचालक मंडळ आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी दिली.

शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत संस्थेकडे करण्यात आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या नोंदणीनुसार मोठ्या संख्येने विद्यार्थी या व्याख्यानमालेचा लाभ घेणार आहेत. सर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी प्रत्येक रविवारी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन कॅपिटल-वन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 − 2 =

error: Content is protected !!