कुस्ती, बॉक्सिंग, जूडो, कराटे, ॲथलेटिक्स, जंप रोप आणि बुद्धिबळात विद्यार्थ्यांची पदकांची लयलूट
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये खादरवाडी येथील मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील गौरवशाली परंपरेला पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. यंदा विविध क्रीडा प्रकारांत चमकदार कामगिरी करत तब्बल १८ विद्यार्थ्यांची थेट राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेसह बेळगावच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी कुस्ती, बॉक्सिंग, जूडो, कराटे, ॲथलेटिक्स, जंप रोप आणि बुद्धिबळ अशा विविध क्रीडा प्रकारांत सहभाग घेत पदकांची कमाई केली. अनेक विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले, तर काही खेळाडूंनी द्वितीय क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. दरवर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यार्थी पाठविण्याची शाळेची परंपरा यंदाही कायम राहिली आहे.
पदक विजेत्या विद्यार्थ्यांची कामगिरी :
- कुस्ती : सिद्धांत कडली, विद्या सुतार आणि नागराज मल्लाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रताप शिवणगेकर, आर्या राऊत, अजान शरीफ, प्रथमेष सुतार, श्रेया पाटील, श्रावणी कंग्राळकर, सानवी पाटील, सई पाटील, जाकिरा सनदी, कैफ दामनेकर आणि अभिषेक हल्लूर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
- बॉक्सिंग : वैभव बडकर, अभिषेक हल्लूर, सुतेज गोजेकर, कार्तिक कलनायकर, श्रावणी पाटील आणि विद्या सुतार यांनी प्रथम क्रमांक मिळविला. संपत संकेशरी, समर्थ बाळेकुंद्री आणि सचिन मौर्य यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
- जूडो : अजान शरीफ आणि सिद्धांत कडली यांनी प्रथम क्रमांक, तर राधिका नेसरकर, आचल पाटील, आराध्य पाटील आणि मधु गावडे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
- ॲथलेटिक्स : ध्रुव हलगेकर याने ८० मीटर हर्डल्समध्ये प्रथम आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. आचल पाटील हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला.
- जंप रोप : श्रवण पाटील, संस्कृती माळवी आणि जाहिद सैय्यद यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
- बुद्धिबळ : जाहिद सैय्यद याने प्रथम क्रमांक पटकावला.
- कराटे : सानवी राजू पाटील हिने प्रथम क्रमांक, तर अरव डोळेकर आणि श्री यालजी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शाळा समिती, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मार्गदर्शन आणि प्रोत्साहन
या यशामागे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन, वनश्री नायर यांचे विशेष मार्गदर्शन तसेच शिक्षकवर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. क्रीडाशिक्षक पै. अतुल सुरेश शिरोळे यांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. शाळा प्रशासन आणि क्रीडा विभागाच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना हे यश संपादन करणे शक्य झाले.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे मराठा मंडळ खादरवाडी शाळेच्या क्रीडा परंपरेचा गौरव अधिक उंचावला असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही हे खेळाडू यशाची परंपरा कायम राख
