नॉर्थ कर्नाटक रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सची चमकदार कामगिरी; खेळाडूंनी पटकावली सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके

नॉर्थ कर्नाटक रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सची चमकदार कामगिरी; खेळाडूंनी पटकावली सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके

बेळगाव : कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने ओम नगर येथील शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या स्केटिंग ट्रॅकवर खुल्या नॉर्थ कर्नाटक रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेत ३५० हून अधिक अव्वल स्केटर्सनी सहभाग घेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध गटांत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली.

स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभ बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अभिमन्यू दागा, सूर्यकांत हिंडलगेकर, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे जयकुमार यांच्यासह विविध भागांतून आलेले स्केटिंगपटू आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंना पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेतील विजेते खेळाडू

स्पर्धेतील विविध गटांत आदित्य तेगनूर, अंजली ढवळे, मान्यया कलघटगी, प्रीतम बागेवाडी, अद्विक चौगुले, गौसणीज मुल्ला, सार्थक चव्हाण, आरना, आर्या कदम, आराध्या पी., सौरभ साळोखे, जान्हवी तेंडुलकर यांच्यासह अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.

इतर विजेत्यांमध्ये विद्यपन जेवर्गी, मोहम्मद कोतवाल, विनमई, सुशविन हलपटी, अद्विक वेणगी, मोहम्मद बाषा, आध्या होस्मनी, प्राणिका मोटेकर, लिटिका, सांमवी, नमन कल्याणकर, अन्वित, मोहम्मद महाबली, स्वस्तिक जेवर्गी, ईशान पन्हाळकर, वरद, आहाणा गांजगिरी, श्रेया मगर, तनिषा, आयुष नाईक, राहत पटेल, ईशान अगदी, सुदीप सिन्हा, जैनिक शहा, दुर्वा पाटील, नूरजना, प्रतिमा, मल्लिकार्जुन पाटील, सिद्धार्थ, शाश्वत विश्वकर्मा, सूफीयान शाहबादी, शिवंत हिरेमठ, श्रीरी कूरी, सिंधू, प्रीती, ऋतरा दळवी, धनिषा परमार, सिद्धार्थ पाटील, हनुमंत कदम, ऋत्विक दुबाशी, अनघा जोशी, स्नेहा पाटील, तन्वी आणि मैथिली यांचा समावेश आहे.

या खेळाडूंनी विविध प्रकारांत एक किंवा दोन सुवर्ण, रौप्य अथवा कांस्य पदके मिळवत स्पर्धेत आपला ठसा उमटवला.

इनलाइन स्केटिंग स्पर्धेतही खेळाडूंचे यश

इनलाइन स्केटिंग प्रकारातही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. हणमंत, दियान, पीयूष, जे कवींना, अमिषा वेर्णेकर, अवनीश कामनवर, आरोही महारनूर, शल्य तारळेकर आणि सिद्धी जैन यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके मिळवत विशेष कामगिरी केली.

याशिवाय जॅक पिंटो, अगस्त्य तोरगळ, इरा हणजे, अनुष्का, तन्वी, प्रियंका, विश्वतेज पवार, आर्यन, विहान माशेलकर, अवंती हुलमणी, चुनिरा शेख, प्रीतम, मनन अंबिगा, चिराग, अधिकरज्ज, श्रीशांत, स्वरा दोडमणी, ऋतू, स्वरा पावसकर, संजित, यशराज पाटील, गौतमी, तनुश्री रेड्डी, तुबा पठाण, आरना कूरी आणि संजना यांनीही विविध पदके पटकावली.

इनलाइन प्रकारात हणमंत, दियान, पीयूष, जे कवींना, अमिषा वेर्णेकर, अवनीश कामनवर, आरोही महारनूर, शल्य तारळेकर आणि सिद्धी जैन यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके जिंकली. तर अन्य खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली.

आयोजनासाठी पंच आणि सहकाऱ्यांचे योगदान

स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी चीफ रेफरी स्मृती, अक्षय सूर्यवंशी, मल्लिकार्जुन, शशिधर पाटील, योगेश कुलकर्णी, सूरज शिंदे, अजित शिलेदार, विठ्ठल गंगणे, ऋषिकेश पसारे, विनायक पाटील आणि सोहम हिंडलगेकर यांनी सहकार्य केले.

या स्पर्धेमुळे उत्तर कर्नाटकातील स्केटिंगपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. बेळगावच्या खेळाडूंनी विविध प्रकारांत मिळवलेल्या यशामुळे स्केटिंग क्षेत्रातील त्यांची प्रगती अधोरेखित झाली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + 2 =

error: Content is protected !!