वडगावातील आनंदनगर येथे ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू; एकविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

वडगावातील आनंदनगर येथे ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू; एकविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

शहापूर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंद; घटनेचा तपास सुरू

बेळगाव : शहरातील वडगाव येथील आनंदनगर परिसरात ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून प्राप्त झालेल्या एफआयआरनुसार, मृत महिलेचे नाव पूनम अमित देळेकर (वय ३६) असे असून, त्या आनंदनगर सेकंड क्रॉस, वडगाव येथील रहिवासी होत्या.

या प्रकरणी अनंत बाळू पाटील (वय ६४, रा. बिच्छू गल्ली, शहापूर) यांनी शाहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे रंजन मरवे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०३(१), ३५२ आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, ही घटना २९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९.३० ते ३० ऑक्टोबर रोजी पहाटे २.३० या कालावधीत घडल्याची नोंद आहे. या घटनेची माहिती ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३.१५ वाजता पोलिसांना देण्यात आली.

या प्रकरणी शाहापूर पोलीस ठाण्यात क्राईम क्रमांक १४३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. महिलेच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती आणि घटनेचे कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.

सदर बातमी उपलब्ध पोलीस एफआयआरमधील नोंदींवर आधारित असून, आरोपीवरील आरोप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight − one =

error: Content is protected !!