२०२१ च्या महामोर्चा खटल्याची शुक्रवारी सुनावणी

२०२१ च्या महामोर्चा खटल्याची शुक्रवारी सुनावणी

सर्व संबंधित कार्यकर्त्यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आवाहन

बेळगाव :

मराठी भाषेतील कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी २५ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी हा मोर्चा धर्मवीर संभाजी महाराज चौकात रोखल्यानंतर समितीचे नेते व कार्यकर्त्यांनी तेथेच धरणे आंदोलन करून आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली होती.

कोरोना काळातील निर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून या आंदोलनप्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी बेळगाव येथील पाचव्या अतिरिक्त न्यायालयात होणार आहे.

या खटल्यातील काही संबंधित कार्यकर्ते सुनावणीच्या वेळी वारंवार अनुपस्थित राहत असल्याने न्यायालयाने याची गंभीर दखल घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यापुढे सुनावणीला गैरहजर राहणाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी केले जाऊ शकते, अशी ताकीदही न्यायालयाने दिल्याचे समजते.

खटला क्रमांक १४५/२०२१ मधील सर्व संबंधित कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता न्यायालयात आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन वकील महेश बिर्जे यांनी केले आहे.

खटल्यातील संबंधित कार्यकर्त्यांची नावे

मनोहर कल्लाप्पा किनेकर, प्रकाश आप्पाजी मरगाळे, शुभम विक्रांत शेळके, प्रकाश रामचंद्र शिरोळकर, किरण गोविंदराव गावडे, रेणू सुहास किल्लेकर, सरिता विराज पाटील, श्रीकांत नाथाजी मांडेकर, रवी महादेव साळुंखे, धनंजय राजाराम पाटील, मदन बाबुराव बामणे, मालोजी शांताराम अष्टेकर, नेताजी नारायण जाधव, बंडू शंकर केरवाडकर, गजानन पाटील, संदीप सुभाष चौगुले, दिगंबर मारुती कातकर, परेश गोपाळ शिंदे, विनायक यल्लाप्पा सांबरेकर, हनुमंत कृष्णा मजुकर, रामचंद्र शंकर कुद्रेमानीकर, विनायक बाळकृष्ण पावशे, नागेश बळीराम किल्लेकर, उदय नारायण नाईक, अनिल बबन हेगडे, माधुरी अनिल हेगडे, संदीप काशिनाथ मोरे, मल्हारी पावशे, चेतन पारिस पाटील आणि कृष्णा भरमा गुरव.

सर्व संबंधित कार्यकर्त्यांनी सुनावणीच्या दिवशी वेळेत न्यायालयात उपस्थित राहून न्यायालयीन प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × five =

error: Content is protected !!