बेळगाव : गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी भाजप नेते किरण जाधव यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडपांना भेट देऊन पूजन केले. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.
यानंतर ११व्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जाधव यांनी शहरातील विसर्जन मार्ग व उंड्यांची पाहणी केली.
बेळगाव नरवेकर गल्ली युवक मंडळाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलताना किरण जाधव म्हणाले की, “बेळगाव गणेशोत्सव अतिशय भव्य स्वरूपात साजरा होत आहे. गणराय बेळगावच्या जनतेला सुख, शांती, समाधान आणि विकास देवो,” अशी त्यांनी प्रार्थना केली. तसेच, “बेळगावातील जनता ही शांततेवर प्रेम करणारी आहे. येथे जात, पंथ, धर्मभेद न पाहता सर्वजण उत्सव साजरा करतात. विघ्नहर्ता गणराय सर्वांचे संकट दूर करो,” असेही ते म्हणाले.
भारत श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अनसुरकर गल्ली, मारीती गल्ली व नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने नगरसेवक संतोष पेडणेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच मंडळाचे पदाधिकारी किरण जाधव यांचा सत्कार करून गणेशदर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला.
या प्रसंगी अनेक कार्यकर्ते आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.