काळ्या दिनानिमित्त शहापूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीकडून जनजागृती बैठक

काळ्या दिनानिमित्त शहापूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीकडून जनजागृती बैठक

१ नोव्हेंबरच्या काळ्या दिनानिमित्त कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

बेळगाव : प्रतिनिधी

१ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेच्या वेळी मराठीबहुल सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ दरवर्षी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शहापूर विभागाच्या वतीने जनजागृती बैठक घेण्यात आली. या बैठकीत काळ्या दिनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले.

यावेळी शहापूर समितीचे ज्येष्ठ नेते नेताजी जाधव आणि समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी हावळानाचे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांच्या भावना आणि सीमाप्रश्नाबाबतची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत राजकुमार बोकडे, अभिजीत मजुकर आणि गजानन शहापूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी परशराम शिंदोळकर, शिवाजी उचगावकर, कृणाल कोचेरी, दीपक तुळसकर, राहुल बोकडे, रजत बोकडे, आकाश मठवाले, राजू नेसरीकर, रवी जाधव, दीपक गौंडडकर आणि रवि पवार यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीची प्रस्तावना रणजीत हावळानाचे यांनी केली, तर त्यांनीच आभार प्रदर्शनही केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 − three =

error: Content is protected !!