बेळगावमध्ये वाहनचालकाला मारहाण करून लूट; तिघांना अटक

बेळगावमध्ये वाहनचालकाला मारहाण करून लूट; तिघांना अटक

४१ हजार रुपये किमतीचा मोबाईल, दोन अन्य मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पोलिसांकडून जप्त

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव-हिंडलगा ब्रीज हायवेवर वाहन अडवून चालकाला मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल फोन जबरदस्तीने लुटल्याप्रकरणी माळमारुती पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ४१ हजार रुपये किमतीचा विवो व्ही-७० एफई मोबाईल फोन, दोन अन्य मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास बेळगाव-हिंडलगा ब्रीज हायवेवर आरोपींनी एका वाहनाला अडवून थांबवले. त्यानंतर वाहनचालकाला मारहाण करून त्याच्याजवळील पैसे आणि मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतले. या घटनेप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२७/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी प्रकाश मनेश्वर कटाबळी (वय १८, रा. संताजी गल्ली, कंग्राळी बी. के.), अमित चंद्रगौडा पाटील (वय २०, रा. इंदू नगर, पाटील गल्ली, यमनापूर, बेळगाव) आणि ओम गणेश पूजारी (वय २३, रा. संताजी गल्ली, कंग्राळी बी. के., बेळगाव) या तिघांना अटक केली.

आरोपींकडून लुटलेला सुमारे ४१ हजार रुपये किमतीचा विवो व्ही-७० एफई मोबाईल फोन, गुन्ह्यासाठी वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक KA-22, EJ-9323) तसेच आरोपींचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त, बेळगाव शहर, तसेच संबंधित पोलीस उपायुक्त आणि एसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, पीएसआय आनंद आदगोंड, श्रीशैल हुलगेरी, उदय पाटील आणि जे. आय. देवडी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करत मुद्देमाल जप्त केल्याबद्दल पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 + 1 =

error: Content is protected !!