बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे २५ ऑक्टोबरला २० वी जिल्हा निवड चाचणी

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे २५ ऑक्टोबरला २० वी जिल्हा निवड चाचणी

रोड व रिंक स्केटिंग स्पर्धांचे आयोजन; निवड झालेल्या खेळाडूंना ४२ व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत मिळणार संधी

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी २० वी जिल्हास्तरीय स्केटिंग निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या निवड चाचणीच्या माध्यमातून ४२ व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी बेळगाव जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे.

या निवड चाचणीअंतर्गत सकाळी ६.३० वाजता बीएसएनएल कार्यालयासमोरील रस्त्यावर रोड स्केटिंग स्पर्धा होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे रिंक स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेतून निवड होणाऱ्या खेळाडूंना आगामी ४२ व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक स्केटिंगपटूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या निवड चाचणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्याशी मोबाईल क्रमांक ९४४९५६३३९३ वर संपर्क साधावा.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 + thirteen =

error: Content is protected !!