बेळगावात चक्रपाणी युद्धकला शिबिराचे उद्घाटन

बेळगावात चक्रपाणी युद्धकला शिबिराचे उद्घाटन

बेळगाव : प्रतिनिधी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने कै. आनंदीबाई कृष्णा वांद्रे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या चक्रपाणी युद्धकला शिबिराचे उद्घाटन रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडले.

या वेळी बेळगाव उत्तरचा राजा समर्थ नगर गणेशोत्सव मंडळ, समर्थ नगर, बेळगाव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच डॉ. प्रकाश राजगोळकर यांच्या हस्ते कै. आनंदीबाई कृष्णा वांद्रे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी अजित जाधव, अनिल मुतकेकर आणि सचिन चोपडे यांच्या हस्ते लाठी-काठी या पारंपरिक युद्धकलेच्या साहित्याचे पूजन करण्यात आले.

सदर चक्रपाणी युद्धकला प्रशिक्षण शिबिर ११ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून पारंपरिक युद्धकलेचे प्रशिक्षण देण्यासोबतच तरुणांमध्ये शौर्य, शिस्त आणि स्वसंरक्षणाची भावना रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − 11 =

error: Content is protected !!