कॅप्टन स्मित मच्छर यांच्या शौर्याला सलाम; हमारा देश संघटनेतर्फे बॅनरद्वारे अभिवादन

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या शौर्याला सलाम; हमारा देश संघटनेतर्फे बॅनरद्वारे अभिवादन

बेळगाव | बेधडक बेळगाव वृत्तसेवा

प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी दाखविलेल्या शौर्याबद्दल कॅप्टन स्मित मच्छर यांना अभिवादन करण्यासाठी हमारा देश संघटनेतर्फे टिळकवाडी परिसरातील दोन ठिकाणी विशेष बॅनर लावण्यात आले.

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या धैर्याला आणि प्रसंगावधानाला सलाम करत त्यांच्या शौर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला नागरिकांसमोर उजाळा देण्यात आला.

या कार्यक्रमाला नगरसेवक नितीन जाधव, सामाजिक कार्यकर्ते सारंग राघोचे तसेच हमार देश संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी संघटनेतर्फे “For Rashtra, For Dharma – Jai Hind” असा संदेश देत देशसेवा आणि राष्ट्रभक्तीची भावना व्यक्त करण्यात आली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen + 14 =

error: Content is protected !!