बेळगाव : मार्कंडेय नगर येथील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर एपीएमसी पोलिसांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई 2 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात आली.
एपीएमसी पोलीस ठाण्याचे पीएसआय एस. के. होळेनवर यांना मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने मार्कंडेय नगर परिसरात सुरू असलेल्या मटका खेळावर छापा टाकला.
या कारवाईत मनोज प्रकाश काळगे (29, ज्योतीनगर, कंग्राळी केएच), भीमप्पा लक्ष्मण ओंटी (32, खडी मशिनजवळ, अलतगा) आणि साईल भाषा पठाण (48, मेन गल्ली, कंग्राळी केएच) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी त्यांच्याकडून रोख 2,252 रुपये तसेच मटका ओसी चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. प्राथमिक चौकशीत मटका खेळातून जमा झालेली रक्कम आरोपी क्रमांक 4 किरण भजंत्री याला देण्यात येणार असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 153/2026 अन्वये कलम 78(3) कर्नाटक पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अन्य आरोपीचा शोध सुरू असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी एपीएमसी पोलिसांचे कौतुक केले आहे.
