बेळगाव : २री ‘जय गणेश श्री’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल बेळगाव उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके यांचा बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्स आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे सचिव राजेश लोहार, अनिल आंबरोळे, सुनील बोकडे, बाबू पावशे, नारायण चौगुले, शिवाजी पाटील तसेच विविध शरीरसौष्ठवपटू उपस्थित होते. मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे आनंद अपटेकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.
शरीरसौष्ठव क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जिल्हास्तरीय स्पर्धांना सहकार्य मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल आयोजकांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
