ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘उमंग २०२६’चे आयोजन; ४ ऑक्टोबरला विविध खेळांची रंगत

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘उमंग २०२६’चे आयोजन; ४ ऑक्टोबरला विविध खेळांची रंगत

बेळगाव : संजीविनी फाउंडेशनतर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘उमंग २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध इनडोअर व आउटडोअर खेळ तसेच कला-गुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता बुधवारपेठ, टिळकवाडी येथील जी. जी. चिटणीस इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे हा कार्यक्रम होणार आहे.

या स्पर्धांमध्ये चित्रकला, क्ले मॉडेलिंग, कॅरम, मेहंदी, रांगोळी, लिंबू-चमचा, मून वॉक, १०० मीटर धावणे, रिले आणि पोत्यांची शर्यत अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कलागुणांसह क्रीडा कौशल्याचे दर्शन घडवावे, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी नोंदणीची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ आहे. अधिक माहितीसाठी ८९०४९ ५०६०३ किंवा ७६२४९ ३१२४९ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संजीविनी फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × three =

error: Content is protected !!