बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रातर्फे ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. नीता देशपांडे डायबेटिस सेंटर येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब देसाई उपस्थित होते. यावेळी कार्यवाह सुरेंद्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील, विजय वाईगडे, बाळकृष्ण बिर्जे आणि उल्हास पानसे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे बाबासाहेब देसाई यांनी ‘मोक्षाच्या सात पायऱ्या व पंच विषय’ या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी मोक्षप्राप्तीच्या विविध पायऱ्या तसेच पंच विषयांचे महत्त्व याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वाती माने यांच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर नारायण कोरडे, रविंद्रनाथ व स्नेहलता जुवळी, विजय वाईगडे, विजय बांदिवडेकर, सतीश देशपांडे, पांडुरंग कारकल, सुरेश प्रभू, सुरेंद्र देसाई, राजेंद्र व श्रद्धा कर्नाटकी, जगमोहन अगरवाल आणि आर. जी. कुंभोजकर यांनी मराठी, हिंदी व कन्नड गाणी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
शिवराज पाटील यांनी स्वागत केले. पाहुण्यांची ओळख सुरेंद्र देसाई यांनी करून दिली, तर उल्हास पानसे यांनी आभार मानले. ज्ञानवर्धक मार्गदर्शनासोबतच गीत-संगीताचा आनंद मिळाल्याने कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
