माळी गल्लीतील ‘बेळगावचा लंबोदर’ गणेशमूर्तीचे कपिलतीर्थ तलावात विसर्जन, पहिला सार्वजनिक गणपती विसर्जन झाला.

माळी गल्लीतील ‘बेळगावचा लंबोदर’ गणेशमूर्तीचे कपिलतीर्थ तलावात विसर्जन, पहिला सार्वजनिक गणपती विसर्जन झाला.

बेळगाव : माळी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या (SSGU) वतीने प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या ‘बेळगावचा लंबोदर’ श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक शुक्रवारी उत्साहात काढण्यात आली.

दुपारी ३ वाजता गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक नवीन कपिलतीर्थ तलाव परिसरात दाखल झाली. विकास कलघाटगी यांच्या हस्ते तलावाचे गंगा पूजन करून माळी गल्ली बेळगावच्या सार्वजनिक मंडळाचा लंबोदर चे प्रथम विसर्जन 3.45 वाजता झाले त्यानंतर इतर गणेशमूर्तीच्या विसर्जनाला सुरुवात करण्यात आली.बेळगाव शहरातील हा पहिला सार्वजनिक गणपती आहे ज्याचे विसर्जन झाले.

दुपारी साडेतीनच्या सुमारास नवीन कपिलतीर्थ तलावात ‘बेळगावचा लंबोदर’ श्री गणेशमूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three + two =

error: Content is protected !!