बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ, झेंडा चौक मार्केट, लोकमान्य टिळक मार्ग यांच्या वतीने आणि बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित १० वी कै. रावसाहेब गोगटे टॉप-१० करेला स्पर्धा २०२६ उत्साहात पार पडली.
मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी तिलकवाडी येथील भाग्यनगरमधील रमणाथ मंगल कार्यालय येथे ही स्पर्धा घेण्यात आली. कै. रावसाहेब गोगटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पुरुष गटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेतील टॉप-१० क्रमवारीत यशवंत सुतार यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर पृथ्वीराज बेगेरिखार यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. भारत तिवारी तृतीय, जग्गार गोरे चतुर्थ आणि गजानन गवाडोजी यांनी पाचवा क्रमांक मिळविला.
स्पर्धेतील टॉप-१० क्रमवारी
- यशवंत सुतार – प्रथम
- पृथ्वीराज बेगेरिखार – द्वितीय
- भारत तिवारी – तृतीय
- जग्गार गोरे – चतुर्थ
- गजानन गवाडोजी – पाचवा
- महादेव बाडवन्नाचे – सहावा
- नंदेव कोकर – सातवा
- सदानंद बाडवन्नाचे – आठवा
- भावेश बेगेरीकर – नववा
- सुमित आपुळे – दहावा
स्पर्धेतील टॉप-१० विजेत्यांसाठी एकूण रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली होती. प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय ४ हजार, तृतीय ३ हजार, चतुर्थ २ हजार ५००, पाचवा २ हजार, तर सहावा ते दहावा क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना प्रत्येकी १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मिहीर पोतदार, अविनाश पोतदार, रमेश गोरल, दिनेश शहा, मनोहर हुकेरीकर, डॉ. श्रीधर शेट्टी, रघुनाथ बंडगी, राकेश कलघटगी, अगा, विजय तळवार, सचिन हांगीरगेकर, अजित सिद्धण्णावर, अमित किल्लेकर, गंगाधर एम., हेमंत हावळ, अॅड. ईश्वर घाडी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाला सुनील आपटेकर, चिंतामणी गसारी, अविनाश हिद्दुगी, मोतीचंद दोरकडी, आकाश हुलियार, शेखर नगरदळेकर, गणेश गुंडोप, सुनील जैन आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.
स्पर्धेच्या आयोजनासाठी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ आणि बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
