बेळगाव : बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स आणि मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘जय गणेश श्री 2026’ बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या चषकाचे अनावरण करण्यात आले.
क्लब रोड येथील डॉ. संजय सुंठकर यांच्या कार्यालयात हा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी ट्रॅफिक विभागाचे असिस्टंट कमिशनर ज्योतिबा निकम, समाजसेवक विकास कलघटगी, दयानंद कदम, कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्सचे अध्यक्ष डॉ. संजय सुंठकर, राजेश लोहार, प्रवीण कणबरकर आणि विजय चौगुले यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्यांना रॉ फिटनेस यांच्या वतीने ट्रॉफी, प्रमाणपत्रे आणि मेडल्स देण्यात येणार आहेत. तसेच राजेश लोहार यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री कै. श्रीमती तायाक्का गणपती लोहार यांच्या स्मरणार्थ ‘जय गणेश श्री’ किताब पटकावणाऱ्या विजेत्यास फिरता चषक देण्यात येणार आहे. या फिरत्या चषकाचेही यावेळी अनावरण करण्यात आले.
याशिवाय स्पर्धेतील विजेत्यास चेतन तहसीलदार यांच्या वतीने सायकल बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
या वेळी अनिल अमरोळे, नारायण चौगुले, सुनील बोकडे, सुनील चौधरी, राजेश लोहार, विजय चौगुले, भारत बाळेकुंद्री, बाबू पावशे, चेतन तहसीलदार, राजू पाटील, प्रवीण कणबरकर, आधीत बेलेकर, गणेश दडेकर, रणजीत किल्लेकर, प्रसाद मरगळे, विकी, दीपक कित्तुरकर आदी उपस्थित होते.
