बेळगाव : स्व. श्री. पुंडलिक रामचंद्र हंगिरगेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सचिन हंगिरगेकर, त्यांच्या पत्नी पूनम हंगिरगेकर आणि कन्या रामनी हंगिरगेकर यांनी स्थापन केलेल्या पुंडलिक रामचंद्र हंगिरगेकर फाउंडेशनतर्फे २२व्या श्री गणेश २०२६ बॉडीबिल्डिंग अँड मॉडेल फिटनेस स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.
शाहापूर येथील श्री राम इनोव्हेशन, महात्मा फुले रोड येथे १ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला. फाउंडेशनच्या सहकार्याने मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ, झेंडा चौक मार्केट आणि बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्योगपती शिरीष गोगटे, रोटरीचे माजी जिल्हा गव्हर्नर अविनाश पोतदार आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष स्वप्नील शहा यांच्या हस्ते स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे हितचिंतक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला अजित सिद्धनावर, मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, एम. गंगाधर, हेमंत हावर, मारुती देवगेकर, गणेश गुंडाप, आकाश हुलियार, गजानन हंगिरगेकर, सुनील पवार, सुनील अश्टेकर, सुनील रावूत, अनंत लांगारकांडे, मोतीचंद दोरकडी, हेमेंद्र पोरवाल यांच्यासह आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रताप कलकुंद्रीकर आणि प्रशांत खन्नुकर तसेच श्री राम इनोव्हेशनचे कर्मचारी उपस्थित होते.
२२वी श्री गणेश २०२६ बॉडीबिल्डिंग अँड मॉडेल फिटनेस स्पर्धा २२ सप्टेंबर २०२६ रोजी रामनाथ मंगल कार्यालय, बेळगाव येथे होणार आहे. स्पर्धेत एकूण ११ श्रेणी असून त्यापैकी ६ बेळगाव जिल्हास्तरीय, ४ ग्रामीण स्तरावरील आणि १ मॉडेल फिटनेस श्रेणीचा समावेश आहे.
या स्पर्धेमुळे बेळगाव परिसरातील शरीरसौष्ठवपटू आणि फिटनेसप्रेमींना आपले कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
