तंजावरमधील सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनासाठी सीमाभागातून सहभागाचे नियोजन

तंजावरमधील सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनासाठी सीमाभागातून सहभागाचे नियोजन

बेळगाव : तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर येथे २३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या १ल्या सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनासाठी बेळगाव सीमाभागातून साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी नियोजन बैठक घेण्यात आली.

या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद गोरे विराजमान होणार आहेत. अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे आयोजित या संमेलनात सीमाभागातील शिवसंदेश भारत तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगावचे सदस्य सहभागी होणार आहेत.

मराठी साहित्य, संस्कृती आणि इतिहासाची समृद्ध परंपरा तंजावरशी जोडलेली असल्याने या साहित्य संमेलनाला विशेष महत्त्व आहे. तंजावरच्या ऐतिहासिक भूमीवर सीमाभागातील मराठी साहित्यिकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीस अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, शिवसंत संजय मोरे, डी. बी. पाटील, रमेश भोसले सर, प्रा. मनीषा नाडगौड, स्मिता किल्लेकर, रोशनी हुंद्रे, संजीवनी खंडागळे आणि पूजा सुतार उपस्थित होते.

यावेळी तंजावर येथे जाणाऱ्या साहित्यिक व साहित्यप्रेमींच्या प्रवासाचे नियोजन, संमेलनातील सहभाग तसेच आवश्यक तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेचा जागर करण्यासाठी आणि तंजावरच्या ऐतिहासिक भूमीवर सीमाभागातील मराठी साहित्यिकांचा सहभाग नोंदविण्यासाठी साहित्यिक व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9591929325

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − 12 =

error: Content is protected !!