सामाजिक बांधिलकी जपत ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम

सामाजिक बांधिलकी जपत ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम

निपाणी : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने निपाणी-मुरगूड रोडवरील देवचंद कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारालगत असलेल्या फुटपाथवर नागरिकांच्या वापरासाठी सिमेंटचे दोन बाक बसविण्यात आले.

या उपक्रमांतर्गत एकूण १२ सिमेंटचे बाक बसविण्यात येणार असून, सर्व बाकांवर नागरिकांना ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी छताची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी तसेच ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव घोरपडे, उपाध्यक्ष दादासाहेब पाटील, विश्वासराव मुधाळकर, व्यंकटराव पाटील, श्रीपती चौगुले, पांडुरंग चव्हाण, गुंडू हेगडे व सुभाष डांगरे सर उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक सेवा संघाने सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सोयीसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे जनतेतून कौतुक होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − fourteen =

error: Content is protected !!