बेळगाव पोलिसांची कारवाई; गांजा, जुगार व अवैध दारूविक्रीवर धडक कारवाई

बेळगाव पोलिसांची कारवाई; गांजा, जुगार व अवैध दारूविक्रीवर धडक कारवाई

बेळगाव : बेळगाव शहर पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी कारवाई करत गांजा विक्री, जुगार आणि परवानगीशिवाय दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

गांजा विक्रीप्रकरणी एकाला अटक : सीसीबी विभागाच्या पथकाने रामतीर्थनगर येथील केएससीए ग्राउंडजवळ कारवाई करून अक्तार युसूफ शेख (वय ४२, रुक्मिणीनगर, बेळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ५५ हजार रुपये किमतीचा १ किलो १४८ ग्रॅम गांजा आणि २० हजार रुपये किमतीची ऑटो रिक्षा, असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुगार अड्ड्यावर कारवाई : काकती पोलिसांनी देवगिरी गावातील स्मशानभूमीजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या भरमप्पा वैजप्पा कुंभारगी (वय २८) याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व पेन जप्त करण्यात आले. काकती पोलिस ठाण्यात कर्नाटक पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

अवैध दारूविक्रीवरही कारवाई : मारीहाळ पोलिसांनी चंदूर गावातील होळेम्मादेवी दाबा परिसरात परवानगीशिवाय दारू विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या बाळप्पा द्यामप्पा निटूर (वय ४२, सोमनट्टी, बेळगाव) याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून डी.के. डबल किक निट व्हिस्कीच्या ९० मिली क्षमतेच्या ८८ टेट्रा पाऊच जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी मारीहाळ पोलिस ठाण्यात कर्नाटक अबकारी कायदा १९६५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व कारवायांमध्ये सहभागी पीआय, पीएसआय, एएसआय आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे बेळगाव शहर पोलिस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 5 =

error: Content is protected !!