शोधमोहीमेला यश; वयस्कर व्यक्ती सुखरूप सापडले

शोधमोहीमेला यश; वयस्कर व्यक्ती सुखरूप सापडले

बेळगाव : १२ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बेपत्ता झालेल्या वयस्कर व्यक्तीच्या शोधासाठी सुरू असलेल्या शोधमोहीमेला अखेर यश आले. १६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता कित्तूरपासून सुमारे ६ किलोमीटर पुढे राष्ट्रीय महामार्गावर सदर वयस्कर व्यक्ती सुखरूप आढळून आल्या.

या शोधमोहीमेत H.E.R.F Rescue Team सोबत दुकानदार, नागरिक, मित्र, नातेवाईक तसेच अनेकांनी सक्रियपणे सहकार्य केले. विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून बेपत्ता व्यक्तीची माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आली. नागरिकांनी केलेल्या एका शेअर, फोन किंवा मिळालेल्या माहितीमुळे शोधमोहीमेला मोठी मदत झाली.

वयस्कर व्यक्ती सुखरूप सापडल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांसह शोधमोहीमेत सहभागी सर्वांनी समाधान व्यक्त केले.

या संपूर्ण मोहिमेत सहकार्य करणाऱ्या प्रत्येक दुकानदार, नागरिक, नातेवाईक, मित्रमंडळी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचा हात देणाऱ्या सर्वांचे H.E.R.F Rescue Teamचे Basavaraj Hiremath यांनी मनःपूर्वक आभार मानले.

“आपली माणुसकी, आपुलकी आणि सहकार्य यामुळेच शोधमोहीमेला यश मिळाले. सर्वांचे सहकार्य सदैव स्मरणात राहील,” असे त्यांनी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 5 =

error: Content is protected !!