बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने ८०व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहात स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले. कॉर्पोरेशन स्केटिंग रिंक येथे झालेल्या या रॅलीमध्ये ३ ते २५ वर्षे वयोगटातील सुमारे ४० स्केटर्सनी सहभाग घेतला.
‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘हर घर तिरंगा’च्या जयघोषात हातात तिरंगा घेऊन स्केटर्सनी सलग ८० मिनिटे स्केटिंग करत स्वातंत्र्यदिन साजरा केला. रॅलीचे उद्घाटन समाजसेवक अर्जुन केसरेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, तुकाराम पाटील, माडीवाले, शिवराज, सोहम हिंडलगेकर यांच्यासह बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रॅलीमध्ये आशिष अंगडीकर, रौनक देशवाल, विहान जगदाळे, नवनीत रविकांत, राजवीर पाटील, शल्य तरळेकर, रीवा नाईक, प्राणिका मोटेकर, पृथ्वीराज शिराळकर, हवीश नायडू, तन्वी हरिदास, साफिया शाहबादी, सिंचना बुरुड, अन्वित पत्तार, दिव्या बेनाली, अंजली ढवळे, राशी जाधव, नमन्या खानगावकर, अथर्व वर्णेकर, जितेश बेनाली, शिव्या तोगली, श्रेया मगर, अरफा काझी, अपेक्षा बुरुड, आरशान माडीवाले, सार्थक मार्डोलकर, सत्यम पाटील, सई पाटील, प्रांजल पाटील, अमिषा वर्णेकर, सार्थक चव्हाण, आर्या कदम, सूफियान शाहबादी, स्वराली पाटील, सर्वेश पाटील, कुलदीप बिर्जे, रश्मीता अंबिगा, हिरेन राज, जयद्यान राज, साईराज मेंडके, अवनीश कोरीशेट्टी आदी स्केटर्सनी सहभाग घेतला.
तिरंगा हातात घेऊन ८० मिनिटे स्केटिंग करत देशभक्तीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
