माळमारुती पोलिसांची ‘अँटी स्टॅबिंग स्क्वॉड’ची कारवाई; तरुणाला अटक, तीन घातक शस्त्रे जप्त

माळमारुती पोलिसांची ‘अँटी स्टॅबिंग स्क्वॉड’ची कारवाई; तरुणाला अटक, तीन घातक शस्त्रे जप्त

बेळगाव : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बेळगाव पोलिसांकडून सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईदरम्यान माळमारुती पोलिसांनी ‘अँटी स्टॅबिंग स्क्वॉड’च्या माध्यमातून एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून तीन घातक शस्त्रे जप्त केली.

16 ऑगस्ट 2026 रोजी माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अँटी स्टॅबिंग स्क्वॉडचे पथक गस्त व तपासणी करत असताना गांधी नगर, अमीनगळी परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाची तपासणी करण्यात आली.

यावेळी रेहान इस्माईल नदाफ (वय 20, रा. गुलजार गल्ली, गांधी नगर, बेळगाव) याच्याकडे शस्त्रे आढळून आली. पोलिसांनी त्याच्याकडून एक लोखंडी कोयता, एक चाकू आणि एक कोयता, अशी एकूण तीन घातक शस्त्रे जप्त केली. तसेच त्याच्याकडील KA-22/HW-7215 क्रमांकाचे दुचाकी वाहनही ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कोणतेतरी गुन्हेगारी कृत्य करण्याच्या उद्देशाने शस्त्रे घेऊन फिरत असल्याचा संशय आहे. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 177/2026, कलम 27(1) Arms Act, 1959 आणि कलम 97 Karnataka Police Act, 1963 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई माळमारुती पोलीस ठाण्याचे PSI श्री. आनंद आडगोंड व त्यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या कारवाईचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त व डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

शहरातील सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या तसेच गुन्हेगारी कृत्यांची तयारी करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 4 =

error: Content is protected !!